Hridayasth Gaani

हृदयस्थ गाणी | पं. हृदयनाथ मंगेशकर | आशा भोसले | लता मंगेशकर यांची गाणी | भाग १

Checkout my music Youtube channel

रसिकहो नमस्कार,
आज आम्ही लाईव कार्यक्रमाच्या सादरीकरणातून तुमच्या पर्यंत पोहोचतोय. आम्हाला आपले आशीर्वाद आणि शुभेच्छांची खूप गरज आहे.
हृदयस्थ गाणी हा गुरुवर्य पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आहे. हा आम्ही तीन भागात प्रस्तुत करणार आहोत.

या कार्यक्रमाचे संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन लाईव आहे परंतु एकच स्टेबल कॅमेरा वापरल्या मुळे कदाचित सगळे कलाकार दिसू शकणार नाहीत त्या बद्दल क्षमस्व.
असा आमचा पहिलाच प्रयोग आहे त्यामुळे कार्यक्रमाच्या दरम्यान आम्ही आपणाशी केवळ मेसेजेसच्या माध्यमातूनच संवाद साधू शकतो.

एक वेगळ्याप्रकारचा प्रयोग आम्ही या माध्यमातून करत आहोत.रेकाॅर्डींग व व्हिडिओ क्वालीटी स्टॅन्डर्ड ठेवण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. तरी आपले जे ही सजेशन्स असतील ते आपण इथे नमूद करावेत.

कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा. सारया व्यापातून वेळ काढून गाण्याची साधना मी अनेक वर्षानंतर पुन्हा चालू केली ते गुरूवर्यांच्या आशीर्वादाने आणि आपणासारख्या प्रोत्साहन देणारया रसिक श्रोत्यांमुळेच. आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.

एकाचवेळी हा कार्यक्रम फेसबूक व यु ट्यूब च्या माझ्या चॅनलवरही चालू आहे. आपण माझे यु ट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.

सादरकर्ते-

गायिका- विजयालक्ष्मी मणेरीकर
हार्मोनियम – सागर कुलकर्णी
तबला- हितेश्वर पाटील
गिटार- संजय हिवराळे
निवेदक – महेश गाडगीळ
ऑक्टोपॅड- प्रज्योत आढाव
साईड रिदम- ईश्वरी वैरागकर
साऊंड रेकोर्डीग– पवन वंजारी
साऊंड इंजिनिअर- प्रशांत पंचभाई
स्टुडीओ डीजायनींग – रोहीत पगारे
कॅमेरामन – सुशील सोनवणे
व्हीडीओ एडीटींग – मेहराज शेख

Share This