Sudnyan Entertainment

सुज्ञान एंटरटेनमेंट ही नाशिक स्थित संगीताशी संबंधित संस्था आहे. गेले केवळ दोनच वर्षात १५० पेक्षा जास्त विविध मैफिलींची व्हिडिओ अल्बमची निर्मिती आणि आयोजन करण्यात त्यांना यश आले आहे.

दोन हजार वीस पासून या संस्थेने संगीत क्षेत्रात आपले आगमन केले आणि विविध संगीत व नाट्य प्रकल्पांच्या माध्यमातून एक लाखाहून जास्त रसिकांपर्यंत पोहोचले.

गेल्या दोन वर्षांत सुज्ञान एंटरटेनमेंटने अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती आणि आयोजन केले आहे. म्युझिक व्हिडीओ, डॉक्युमेंटरी फिल्म्स, लाईव्ह म्युझिक शो, संगीतमय नाट्य कलाकृती, कविता गाणी व गप्पा असे विविध कलाप्रकार आतापर्यंत सादर करण्यात आले आहेत.

सुज्ञान एंटरटेनमेंट या संस्थेच्या मुख्य संचालक व निर्मात्या विजयालक्ष्मी वैरागकर मणेरीकर आहेत.

पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित “हृदयामृत” माहितीपट व “हृदयलता” या दोन कार्यक्रमांची निर्मिती.

शाम ए गझल, उनसे नैन मिलाकर देखो, महफिल ए गझल – अशा उर्दू गझल कार्यक्रम निर्मिती.

हृदयस्थ गाणी, मगे उभा मंगेश, बरसे बुंदिया सावन की, चांदण्यात फिरताना, कान्हा ( कवीश्रेष्ठ ग्रेस, शांताबाई, सुरेश भट, आरती प्रभू व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम प्रत्यक्ष पंडितजींच्या मार्गदर्शनातून निर्मिती)

कवयित्री श्रेष्ठ शांताबाई शेळके यांच्या जीवनावर आधारित ‘असेन मी नसेन मी’ हा संगीत नाट्यमय कार्यक्रम निर्मिती

सुज्ञान एंटरटेनमेंटने गेल्या दोन वर्षांत असे अनेक उत्कृष्ट कार्यक्रम सादर केले आहेत. या सर्व कार्यक्रमाची संकल्पना व संहिता विजयालक्ष्मी मणेरीकर यांच्या आहेत.

Global Vision School

Kids Pre- School  |  SSC  |  CBSE

Add : Behind Indoline Furniture, Ambad, Nashik

Phone No : Ph : (0253) 2382800, 2382900

Share This