Sainikaho Tumchya Sathi
सैनिक हो तुमच्यासाठी – Sainikaho Tumchya Sathi- Asha BhosleAsha Bhosale Cover Vijayalaxmi Manerikar
Checkout my music Youtube channel
संगीतकार – दत्ता डावजेकर
गीतकार – ग. दि. माडगुळकर
मुळ गायिका – आशा भोसले
चित्रपट – पाहू किती रे वाट (१९६३)
कवर गायिका – विजयालक्ष्मी मणेरीकर
स्वातंत्र्य दिनाच्या मंगल सोहळ्या निमित्त…
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी
वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी
आराम विसरलो आम्ही आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडुनि या इकडे वार्तांसह येतो वारा
ऐकता कथा अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी
रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणांस घेउनी हाती
तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी